वरळी हिट अ‍ॅंड रन घटनेतील पीडित कुटंबाला १० लाख – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना रविवारी पहाटे ( ७ जुलै रोजी ) घडली होती. या घटनेत कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही पुढे येत होती. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना वरळी अपघाताबाबत तसेच पीडित कुटंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, आम्ही पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Protected Content