यावलच्या तहसील कार्यालयाचा सन्मान

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना यावल तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील वाडी,वस्ती आणि पाडा यांना महसुली गावांना दर्जा देणे या कामगिरी बद्दल उत्कृष्ट तहसील कार्यालयाचा यावर्षीचा पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

या सन्मान सोहळा कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते देखील महसुलच्या पथकास सन्मानित करण्यात आले. या महसुली पथका मध्ये यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,मंडळ अधिकारी अतुल बडगुजर,तलाठी मनीषा बारेला, कुर्शाद तडवी, अव्वल कारकून निशा चव्हाण यांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देवुन यांना गौरविण्यात आले.

तसेच जळगाव जिल्ह्यातील सहा तलाठी यांना इ चावडी वसुली अंतर्गत सजाची संपूर्ण वसुली पूर्ण करणे आणि तीन लाखापेक्षा जास्त वसुली करण्यात यशस्वी झालेले असे यावल तालुक्यातील दोन तलाठी भूषण सूर्यवंशी आणि गजानन पाटील यांना देखील या सोहळ्यात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

Protected Content