Home Cities जळगाव “डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा निकालात झेंडा; ९१.१% उत्तीर्णतेचा विक्रम!”

“डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा निकालात झेंडा; ९१.१% उत्तीर्णतेचा विक्रम!”

0
111


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या बी.पी.टी. (Bachelor of Physiotherapy) हिवाळी अंतिम वर्षाच्या निकालात जळगावच्या गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत ९१.१% निकालाची नोंद केली आहे.

या परीक्षेत ज्योत सचदेव हिने ७१.६२% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर खुशी नवल हिने ७०.७५% गुण मिळवत दुसरा क्रमांक आणि अन्विषा सांखे हिने ७०.५०% गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव वर्षा पाटील, संचालक डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयवंत नगूलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमासोबतच शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला आणि संस्थेच्या सुनियोजित व्यवस्थापनाला असल्याचे प्राचार्य डॉ. नगूलकर यांनी सांगितले.


Protected Content

Play sound