Home क्राईम किराणा दुकानातून चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद; चौकशी सुरू

किराणा दुकानातून चोरी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद; चौकशी सुरू

0
173

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील रणछोडदास नगर भागातील सुदर्शन सुपर शॉपमध्ये मागील आठवड्याभरापासून चोरी करणाऱ्या महिलेला अखेर रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

संबंधित महिला खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित करून दुकानातील वस्तू चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उघडकीस आला. संशय आल्याने दुकानदाराने काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही तपासले असता चोरी स्पष्ट झाली.

आज पुन्हा ती महिला दुकानासमोर आल्याचे दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत महिलेने स्वतःचे चुकीचे नाव सांगितल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound