प्रमाणिकपणा : सापडलेला मोबाईल मालकाला केला परत

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रेल्वे स्थानकावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तरुणाला नळाजवळ एमआय मोबाईल आढळून आला. याबाबत तरुणाने पोलिसांना माहिती दिल्याने मोबाईल मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 31 मे मंगळवार रोजी करीम खान आणि नदीम काजी हे त्यांच्या मित्राला धरणगाव रेल्वे स्थानकावर नेण्यासाठी गेले होते. तेव्हा रेल्वे स्थानकावर पाण्याच्या नळाजवळ कंपनीचा एमआय मोबाईल आढळून आला. त्यानंतर करीम खान आणि नदीम यांनी त्या मोबाइल बाबत माहिती धरणगाव पोलीस स्टेशन येथील गोपनीय विभागाचे वैभव बाविस्कर  यांच्याशी संपर्क साधून मोबाइल मालक काशीनाथ पाटिलचा मुलगा शुभम पाटिल यांना फोन करून या मोबाईलची माहिती दिली.

1 जून बुधवारी धरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआई जीभाऊ पाटिल यांच्या समोर काशीनाथ पाटिल यांच्या नातेवाईक बाबा जाधव रा.पश्टाने यांचे कड़े देण्यात आले

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!