हा तर लोकशाहीवरील हल्ला – ना. बाळासाहेब थोरात

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीकडून आलेली नोटीस हा लोकशाहीवरील हल्लाच असल्याची टीका महाविकास आघाडीतील काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावरून काँग्रेस पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून हि बाब देशाच्या भवितव्याची चिंता वाढवणारी असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

भाजपा प्रणीत केंद्र सरकार गेल्या आठ वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापरच करीत आहे. विरोधकांना त्रास देण्यासह नामोहरम केले जात आहे. एवढेच नव्हेतर धार्मिक तेढ वाढविण्यासाठी या सर्व यंत्रणाचा वापर करीत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. सर्वसामान्य जनता सर्व काही जाणून असून जनता आमच्याकडे सोबत आहे. जनताच भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही महाविकास आघाडीचे महसूल मंत्री बाळासाहेब यांनी दिला आहे.

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content