हिंगोण्यात पाऊसाची हजेरी

0

 

higonaa

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा परिसरात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असुन, या वादळात काही घराचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील हिंगोणा या गावात व परिसरात आज (दि. ७ जून) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे गावातील काही घरांच्या छतावरील पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. याशिवाय हिंगोणा गावातील मुख्य बाजार चौकातील विद्युत खांबावरील तारे देखील या वादळात तुटून पडली आहे. तसेच गावातील उर्दू शाळेच्या आवारातील मोठे वृक्ष हे उन्मळुन पडले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या संकटात सापडलेल्या या पाण्याअभावी संकटात सापडलेल्या हिंगोणाली नागरिकांना तसेच परिसरातील शेतकरी बांधवांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!