हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना लसीकरणाकरीता सज्ज

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथे सोमवार दि. ८ मार्चपासुन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण सत्रांना सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर आज प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा तालुका यावल येथे कोरोना लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आज महत्वाची बैठक पार पडली. 

या बैठकी मध्ये सोमवार पासुन सुरु होणाऱ्या लसीकरणाकरीता वय वर्ष ६० पासुन वरील सर्व नागरीक तसेच ४५ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड नागरीक अपेक्षित असुन, त्याकरीता माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातील माहितीच्या आधारे सर्व अपेक्षितांची यादि तयार करावी. तसेच रोज सुमारे २०० नागरीकांचे लसीकरण करावयाचे उद्धीष्ट असुन त्याकरीता आवश्यक नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, लसीकरणाच्या नंतर निरीक्षण कक्षात आवश्यक असलेल्या सोयी सुविधांविषयी सुचना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. 

बैठक संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेसंदर्भातील सर्व नियोजन करत ‘ड्राय रन’ घेण्यात आलेत. कोरोना लस हि उत्तम व सुरक्षीतअसुन याचे कुठलेही दुष्पपरिणाम आजपर्यंत दिसुन आलेले नाहीत, सोमवारी हिंगोणा गावातील अपेक्षित नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत संख्येने नागरीकांनी कोरोना लसीकरण मोहीमेत सहभाग घेवुन लस टोचणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी केले आहे.

सदरील नियोजनाकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांच्यासोबत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अतुल वायकोळे, डॉ. तृप्ती चौधरी, आरोग्य सहाय्यक अशोक तायडे, कनिष्ठ साहाय्यक पंकज चोपडे, आरोग्य सेविका – कल्पना पाटिल, वैशाली तळेले, कामिनी किनगे, आरोग्य सेवक – विलास महाजन, त्र्यंबक सावळे, कैलास कोळी, निलिमा महाजन व इतर कर्मचारी व आशा वर्कर या बैठकीस उपस्थित होते.

 

Protected Content