पिंप्री खुर्द येथे उद्यापासून तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’; ग्रामपंचायतीचा निर्णय

पिंप्री खुर्द (प्रतिनिधी) । धरणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंप्री खुर्द गावात उद्यापासून २० जून ते २२ जूनपर्यंत तीन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती, व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने हा बंदच्या निर्णय घेण्यात आला आहे. या काळात गावातील फक्त किराणा दुकान, मेडिकल व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. तसेच दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पर्यतच सुरू राहिल. या व्यतरिक्त सर्वच व्यावसाईक दुकाने उदया २० जूनपासून तीन दिवस कडकडीत बंद राहतील. या काळात वरील व्यतिरिक्त ज्या व्यवसाईकांची दुकाने उघडी आढळल्यास त्यांना प्रथम २०० रूपये तर नंतर ५०० रूपये दंड आकारण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नये, प्रत्येकाने तोंडाला मास्क किवा रुमाल बांधणे सक्तीचे आहे. विना मास्क कुणी आढळल्यास त्याना ५० रुपये दंड करण्यात येणार आहे. गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या तीन दिवसीय जनता कर्फ्यूस सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समिती, व्यापारी, व्यवसाईक बांधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content