धरणगावत अभाविपचे निवेदन; शुल्क आकारणी रद्दची प्राचार्यांचे आश्वासन

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात गेल्यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांकडून लिव्हिंग सर्टिफिकेटच्या नावाखाली २०० रूपयांची मागणी त्वरीत थांबवावी यासाठी अभाविपचे प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. ही शुल्क आकारणी संबंधितांशी चर्चा करून रद्द करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी यावेळी दिले.

येथील इंदिरा गांधी कन्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये १२ वी इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून लिव्हिंग सर्टिफिकेटच्या नावाखाली २०० रुपये प्रती विद्यार्थी आकारले जात होते. या पार्श्वभूमीवर अभाविपच्या शिष्टमंडळाने १३ऑगस्ट रोजी महाविद्यालायचे प्राचार्य.सी.के.आबा पाटील यांची भेट घेऊन सदर शुल्क घेणे त्वरित बंद करावे याबाबत निवेदन दिले.

ही शुल्क आकारणी संबंधितांशी चर्चा करून रद्द करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी यावेळी दिले. प्राचार्य सी.के.आबा पाटील यांचे अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत. महाविद्यालयात ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे ७० हजार पेक्षा जास्त रुपये वाचणार आहेत. कोरोणा या महामारीने विद्यार्थी व त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत असताना त्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी ह्या पद्धतिने पैसे आकारले जातिल त्या त्या ठिकाणी अभाविप संपर्क करेल, यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी अभाविपचे आभार देखील मानले. यावेळी शहरमंत्री भरत भाटीया, अभाविप विद्यापीठ अध्यक्ष आदित्य नायर, तालुका प्रमुख दीपक धनगर, निलेश माळी, अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content