किरकोळ कारणावरून तरुणासह त्याच्या आईला मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक किरकोळ कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, रविंद्र पाटील ( वय 28, रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव हा तरुण आपल्या पत्नी आणि आईसह वास्तव्याला आहे. गावातील झालेल्या किरकोळ कारणावरून रवींद्र पाटील याला गावात राहणारे बाळू आत्माराम पाटील, रवींद्र आत्माराम पाटील, सुनंदा बाळू पाटील आणि भाग्यश्री रवींद्र पाटील सर्व रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव यांनी लाकडी दांडाने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली, तसेच रवींद्र पाटील यांच्या आईला देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

हा प्रकार घडल्यानंतर रवींद्र पाटील यांची पत्नी योगिता रवींद्र पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन ४ जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी बाळू आत्माराम पाटील, रवींद्र आत्माराम पाटील, सुनंदा बाळू पाटील आणि भाग्यश्री रविंद्र पाटील या चौकात विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Protected Content