राज्यभरात सतर्कतेचा इशारा : पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर राज्यातील स्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस खाते अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार आज राज्यात ठिकठिकाणी महाआरत्यांचे आयोजन करण्यात आले असून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यामुळे अद्याप तरी कुठेही स्थिती बिघडलेली नसली तरी याबाबतची शक्यता गृहीत धरून पोलीस खाते सावध असल्याचे दिसून आले आहे. राज्यात ठिकठिकाणी कडेकोटे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबई पोलीस आयुक्त संंजय पांडे यांच्यासोबत एक बैठक घेतली. त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. सोबतच पोलीस दल उद्भवणार्‍या प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

याबाबत महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून राज्यातील महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणच् बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील पोलिसांच्या मदतीला ८७ एसपीआरएफ पथके, ३० हजार गृहरक्षक जवान तैनात करण्यात आले आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, असा विश्वास रजनीश सेठ यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content