नागपुरात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

garpith

 

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसासह जोरदार गारपीटी झाल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गारपीटमुळे कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे.

विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील इसपूर, झिपला, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी येथे पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच मध्यरात्री जोरदार गारपीटझाल्यामुळे मोसंबी, संत्रा, कपाशी तसेच अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. काटोल तालुक्यात खापा परिसरात पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचेही नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, काही भागात गारपीटही झाली.

Protected Content