चोपडा बाजारपेठेचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणार – माजी आ. कैलास पाटील

kailas pail

चोपडा प्रतिनिधी । चोपड्याचा विकास करण्यासाठी उद्योग धंदे यायला हवे, उद्योग धंदे आले तर बेरोजगारांना काम मिळेल. तसेच शेतीला पूरक धंदा आणला तर शेतकरी हा सक्षम होवून शेतकरी सक्षम होईल. यामुळे बाजारपेठेत आवाक-जावक वाढेल आणि चोपडा बाजार पेठेचा दर्जा कसा वाढेल, याकड़े लक्ष देणार असल्याचं प्रतिपादन माजी आ. कैलास पाटील यांनी केलं. चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्या प्रचारार्थ व्यापाऱ्याचा बोथरा मंगल कार्यालयात आयोजित संवाद मेळाव्यात बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, मी आमदार असतांना अनेक विकास काम केले आहेत. चोपडा तालुक्यात सूतगिरणी उभारून दाखवली. आज ती सूतगिरणीवर जवळपास पाचशे कुटुंब पोट भरत आहेत. दिवाळीच्या काळात वेळोदे परिसरात पावरलूमचे भूमिपूजन करणार आहोत. औद्योगिक वसाहत सूसज्ज स्वरूपात उभारायचा माणसे आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचे नेते नाथाभाऊ दवाखान्यात ऍडमिट होते, तेथून चोपड्याचा आमदाराशी दूरध्वनीवरून विनंती केली होती. आपण महायुतीचा उमेदवार रक्षा खडसेंचा प्रचार करा, तरीही यांनी त्यावेळी युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे चोपडा तालुक्यातील सर्व पक्षिय मंडळीनी प्रभाकर सोनवणेंना उभे राहण्यासाठी साकडे घातले होते व्यापाऱ्याची ताकदीने ते निवडून येतील, अशी मला खात्री आहे. यावेळी हजारो व्यापारी हजर होते.

यावेळी इंदिरा पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्यासह भाजपाचे पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, चोपडा तालुक्यात शिवसेना वाढवली, रुजवली कोणी ? कैलास बापू, सुशील ठाकरे, मी स्वतः अश्या अनेक लोकांनी शिवसेना वाढवली. शिवसेनाचे कन्हैय्या बंधूचे बलिदान गेले. तेव्हा माझ्या मांडीवर त्यांनी आपली प्राण ज्योत मालवली होती. शिवसेना वाढवली तेव्हा काय हाल अपेष्टा सहन केले अनेक केसेसमध्ये अडकवले गेले, अश्या परिस्थितीत आम्ही शिवसेना घराघरापर्यंत पोहचवली आहे. असे भावनात्मक उद्गार आत्माराम म्हाळकेंनी यावेळी काढले.

यानंतर अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मला एक वर्ष आधीच सर्व पक्षीय उमेदवार म्हणून घोषित केले म्हणून मी उमेदवारी दाखल केली. मी समाज कल्याण सभापती असून येथे दरवर्षी ५० कोटी रुपये निधी येतो त्या निधी मी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकास निधी दिला आहे. कोणताही उद्योग न आणल्याने चोपडा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगार करून टाकले. चोपडा तालुक्यातील बिल्डर्सकडून कामे हिसकावून घेतले. तालुक्यातील विकास व प्रगती करणे आवश्यक आहे. केळीवरील उद्योग आणणार, सातपुड्यातून पाणी वाहून जात असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बंधारे बांधून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहीम सुरू करणार आणि शहरात २ ते ३ दिवसाआड पाणी देण्याचे प्रयत्न करू नगरपालिकाची पाणी पुरवठा योजनेचा ६५ कोटी रुपये मंजूर झाले ते भाजपाचे संकटमोचन नेते गिरीष महाजन यांच्या सहकार्याने मंजूर झाली आहे. आणि मी निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच ५० कोटी रुपये विकास निधी आणणार अशी घोषणाही सोनवणे यांनी केली.

यावेळी अमृतराज सचदेव, हिम्मतसिंग राजपूत, अनिल शर्मा, नरेंद्र पाटील, श्रीकांत नेवे, देवेंद्र पाटील, ए.डी.चौधरी, रवी मराठे, पप्पू सोनार, संजय श्रावगी, प्रभाकर पाटील, सुनील शर्मा, मनीष पारीख, मनीष गुजराथी, राहुल जैन, भटू सोनार, धिरेंद्र जैन, कल्पना जगताप, नितीन अहिरराव, गिरीष पालिवाल, जय माधवानी, जीवन पाटील, सुशील अग्रवाल, नंदलाल अग्रवाल, हंसू पोतदार, राम सोमाणी, अजय कानडे, मोहन राजपुरोहित, छोटू जैन, सिद्धू पालिवाल, मिलिंद खिलोसिया, भरत जैन, डॉ.आर.टी.जैन, सुंदरलाल सचदेव, राजेंद्र टाटीया, अनिल अग्रवाल, जे.टी. पाटील, धिरज अग्रवाल यांच्यासह आदी व्यापारी संवाद मेळाव्या उपस्थितीत होते.

Protected Content