पंतप्रधान मोदी १६ तारखेला धुळ्यात; विविध विकासकामांचे भूमिपूजन

धुळे (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी दि.16 फेब्रुवारी रोजी धुळ्यात येत आहेत. त्यात सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना तसेच मनमाड-धुळे-इंदूररेल्वे मार्गाचा समावेश आहे.  यावेळी मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभेच्या नियोजित सभेसाठी जागेची प्रशासनातर्फे नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व पदाधिकारी तसेच पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे उपस्थित होते. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही पहिलीच सभा असल्याने भव्य मैदान निवडले जात आहे.

धुळेकरांच्या अनेकवर्षांचे स्वप्न असलेल्या मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाच्या कामाला मंजुरी मिळून अखेर प्रत्यक्ष सुरवात होत आहे. तसेच सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन देखील होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहिर सभा धुळ्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकी पूर्वी होणारी ही पहिलीच सभा असल्याने त्या दृष्टीनेआज संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्षअनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, पोलीसअधिक्षक विश्वास पांढरे, डी.वाय.एस.पी. विवेकपानसरे, नगरसेवक युवराजपाटील, भाजपचे ओम खंडेलवाल, भिकन वराडेआदींनी शहरातील दसेरा मैदान जवळील गो-शाळा तसेच रामपॅलेस समोरील खुले मैदान आणि सुरत बायपासवरील हिरेमेडीकल कॉलेज समोरील जागेची पाहणी केली. गेल्या निवडणुकी वेळी नरेंद्र मोदी यांची पारोळा रोड वरील मैदानावर सभा झाली होती.

Add Comment

Protected Content