एरो इंडियाच्या कार्यक्रमादरम्यान कार पार्किंगला भीषण आग

बंगळूरूतील घटना; अनेक चाकचाकी वाहने भस्म
कोट्यावधी रूपयांचे नुकसान
बंगळुरु । कर्नाटकातील बंगळुरु शहरातील एरो इंडियाच्या ‘शो’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनी पार्किंग झोनमध्ये भीषण आग लागली असून या आगीत पार्किंगमध्ये उभी असलेली शेकडो वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. पार्किंगमधील गवताच्या पेंड्यांना आग लागून ती मोठ्या प्रमाणात पसरल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याआधी 19 फेब्रुवारी रोजी एरो इंडिया शो दरम्यान दोन विमाने आपापसात धडकली होती. ते वृत्त ताजे असतांना ही दुसरी घटना घडली आहे. गवताच्या पेंड्यांना लागलेली आग संपूर्ण पार्किंग परिसरात पसरली. आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले आहेत. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शेकडो गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

हाकेच्या अंतरावर आहेत विमाने
पार्किंग एरिया हा रनवेपासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. रनवेवर अनेक अत्याधुनिक विमाने उभी आहेत. हवेचा जोर जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. आग विमानांपर्यंत पोहोचणार नाही, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

Add Comment

Protected Content