आदिवासी कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी मनीष तडवी यांची निवड

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी पतपेढीमध्ये परिवर्तन पॅनलचे मनीष तडवी यांची चेअरमनपदी तर व्हा. चेअरमनपदी विनोद पाटील आणि सचिवपदी अविनाश शिवरामे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

३५ वर्षाच्या कालखंडामध्ये आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटीत पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागातील कर्मचारी बांधवांनी परिवर्तलने भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलचे प्रमुख एम. बी. तडवी, एच. डी. पाटील, रवींद्र भादले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलचे संभाजी पाटील, अविनाश शिवरामे, मनीष तडवी, विनोद पाटील, रचना पाटील विलास भोई हे विजयी झाले.

परिवर्तन पॅनलच्या यशामध्ये आप्पासो भरत पटेल, विजय कचवे, हिरालाल पवार, भूपेंद्र पाटील, दस्तगीर तडवी, विष्णू गुळवे, संजय अलोने, मोनिका खरात, राजेंद्र बोदडे, महेंद्र पाटील, उत्तमराव मनगटे, भालचंद्र पवार, डी. आर. पाटील, किरण पाटील, के. पी. ठाकरे, प्रशांत सैंदाणे, एस. एम. पवार, निलेश तडवी, विजयानंद सुरवाडे, सुहास देवराज, रमेश तडवी, युनूस तडवी, पी. डी. पाटील, प्रमोद पाटील, पंकज पाटील, भूषण भदाणे, विवेक पाटील तसेच यावल ऑफिस, वसतिगृह, शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक अधिकारी पी. के. विरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

Protected Content