मोठी बातमी : राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थागिती

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । “मोदी आडनावाची” बदनामी केल्याच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने (Suprime Court) स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभेचं सदस्यत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी व काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

 

कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी यांनी देशातून फरार झालेले नीरव मोदी व ललित मोदी (modi)यांच्याबाबत बोलताना मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. ‘सर्व मोदी चोर कसे?’ असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.

 

राहुल गांधी यांच्या या विधानाला आक्षेप घेत गुजरातमधील भाजपचे पदाधिकारी पूर्णेश मोदी (Purnesh Modi)यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी राहुल (Rahul Gandhi)v यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता. त्यावर निर्णय देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेमुळे नियमानुसार त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. स्थानिक न्यायालयाच्या निर्णयास राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवली. अखेर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

सर्वोच्च न्यायालयात (Suprime Court) न्यायमूर्ती बी आर गवई, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि संजय कुमार यांच्या खंडपीठापुढे आज या प्रकरणी सुनावणी झाली व (Suprime Court)न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे आता ते संसद अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत. त्यांची खासदारकी मिळू शकणार आहे.

Protected Content