प्रभाग रचनेवर धरणगावकर कोर्टात जाण्याच्या तयारीत

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नगरपालिकेच्या प्रभाग रचने संदर्भात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या आरोपासह अनेकांनी तक्रार केली होती. यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई झाली. आपण या सुनवाईवर समाधानी नसून याबाबत हायकोर्टात दाद मागणार असल्याचा पवित्रा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या प्रमुख आरोपासह अनेकांनी तक्रार केली होती. परंतू आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनवाई आमचे कुठलेही म्हणणे व्यवस्थित ऐकून घेण्यात आलेले नाहीय. त्यामुळे आम्ही कोर्टात जाणार अशी भूमिका सर्व तक्रारदार यांनी घेतली आहे.

धरणगाव शहरातील पाताल नगरी, बेलदार मोहल्लासह अनेक मुस्लीम बहुल परिसर दोन ते तीन प्रभागात मुद्दाम फोडण्यात आले आहेत. यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले असून या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याची भूमिका मुस्लीम लोकप्रतिनिधींनी माडली. लोकसंख्येनुसार धरणगावात चार मुस्लीम नगरसेवक निवडून यायला पाहिजे. परंतू मोठे मुस्लीम बहुल परिसर मुद्दाम विभागले गेल्यामुळे आता एक किंवा दोनच नगरसेवक निवडून येतील. अगदी आजच्या सुनवाईत देखील आमचे म्हणणे शांत ऐकून घेण्यात आले नाही. आजच्या सुनवाईवर आमचे समाधान झाले नसून आम्ही कोर्टात जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. यावेळी नगरसेवक अहमद पठाण, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, माजी नगरसेवक राजू शेख, नगर मोमिन, सैफुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत धरणगाव मुख्याधिकाऱ्यांसह काही जणांवर धरणगाव जन मंचचा आक्षेप आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवर आज सुनवाई होत असतांना तेच अधिकारी जर सुनवाई घेत असतील तर न्याय कसा मिळणार?, असा प्रश्न उपस्थित करून याबाबत आपण कोर्टात जाणार आहोत. आपल्या हरकतीवर आजच्या सुनवाई बाबत आपण समाधानी नाहीत. एवढेच नव्हे तर, निवडणुका पारदर्शी होण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही अधिकाऱ्यांची बदलीची मागणी करणार असल्याची माहिती धरणगाव जन मंचचे जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.

नगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकत घेणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांचा देखील समावेश आहे. एकच सिटी सर्वे नंबरची अनेक घरे दोन वेगवेगळ्या प्रभागात दिसत आहेत. त्यामुळे हे मतदार नेमकं कुठे मतदान करतील? असा प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर,  यावरून प्रभाग रचना सदोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज झालेल्या सुनवाई आमचे समाधान झाले नाही. ब्लॉगसह इतर मुद्द्यांवर आम्ही हरकत घेतली होती. परंतू आजची सुनवाई घ्यायची म्हणून फक्त नावाला घेण्यात आली आहे. धरणगावात सत्ताधारींच्या दबावात प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभाग रचना बनविताना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. याबत पुरावे व योग्य ते कागदपत्रे घेऊन आम्ही कोर्टात जाणार असल्याची भूमिका भाजपचे शहरध्यक्ष दिलीप महाजन आणि कन्हैय्या रायपूरकर यांनी मांडली.

Protected Content