दुचाकी चोरांच्या आठ जणांच्या टोळीचा पर्दाफाश

धरणगाव-अविनाश बाविस्कर | येथील पोलीस स्थानकाच्या पथकाने परिसरातून दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, परिसरातील वाढत्या दुचाकी चोरींच्या पार्श्‍वभूमिवर, येथील पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०१५२/२०२२ भा.द.वि कलम.३७९, ४११,३४ प्रमाणे मोटार सायकल चोरी गुन्ह्यातील आरोपी यश दिनेश सातपुते, तुषार महेंद्र बत्तीसे, वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी, मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी, सय्यद पीरण सय्यद मुक्ता, वैभव उर्फ दादू सुरेश मोरे, हसन उर्फ अली मोहम्मद शेख आणि वसीम शेख बिस्मिल्ला यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई धरणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील उमेश पाटील, समाधान भागवत, विनोद संदांशिव, गोपनीय विभागातील वैभव बाविस्कर यांच्या पथकाने केली. दरम्यान, धरणगाव व धुळे येथून आरोपीसह ४ मोटर सायकली व ३ मोटरसायकलींची कापलेली स्पेअर- पार्ट असे जप्त केले तसेच तपास कामात धरणगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागातील श्यामराव भिल, प्रमोद पाटील अश्यांनी कामगिरी केली असून पुढील तपास सुरू आहे. या टोळीच्या चौकशीतून परिसरातील अनेक दुचाकी चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Protected Content