नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेवर नेमकी मालकी कुणाची ? यावरून सुप्रीम कोर्टात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. यातील महत्वाची सुनावणी आज होणार आहे. उध्दव ठाकरे यांच्यातर्फे आधीच हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे देण्याची मागणी करण्यात आली असून यावर कोर्ट कार्य निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आजच निवडणूक आयोगात देखील शिवसेनेच्या मालकीबाबत सुनावणी होणार आहे. यात खरी शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे या महत्वाच्या मुद्यांवर दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडणार असून यावरून निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.