हॉकी सामन्यात हाणामारी : ११ खेळाडूंसह दोन पदाधिकारी निलंबित

neharu cup

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंजाब सशस्त्र पोलीस दल आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यातील जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान (दि.२५ नोव्हेंबर रोजी) तुंबळ हाणामारी केल्याप्रकरणी ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या शिस्तपालन समितीने आज (दि.११) ११ खेळाडूंसह दोन पदाधिकाऱ्यांवर निलंबित केले आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हॉकी स्टिकच्या साहाय्याने हाणामारी करताना अपशब्दांचाही वापर केला. त्यामुळे हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष भाला नाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पंजाब पोलिसांना १२ ते १८ महिने आणि पंजाब बँकेवर ६ ते १२ महिने निलंबनाची कारवाई केली आहे.

Protected Content