नात्यात अंतर पडू देणार नाही ; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना वचन

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही,’ असे वचन उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना दिला आहे. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले की, प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोविड १९, निसर्ग चक्रीवादळात शिवसेनेना व सरकारने केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. शिवसैनिक हे माझ्याभोवतीचे कवच आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. हे कवचही आहे आणि त्यांचा वचकही आहे. याच शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. तसेच सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतानाच काळजी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Protected Content