यावल तालुक्यातील आदीवासी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सातपुडा पर्वतातील जामन्या या आदीवासी भागात भेट देवून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांची व गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अतिरिक्त जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, व आयुष विस्तार अधिकारी, आणि प्रभारी प्रशासन अधिकारी डॉ. मनोहर बावणे यांनी भेट दिली. कुपोषित बालकांची व गरोदर मातांची आस्तेने विचारपूस केली. या क्षेत्रातील गर्भवती महीलांची उपकेन्द्रातच प्रसुती व्हायला हवी अशा सूचना आरोग्य सेविकांना या प्रसंगी दिल्यात, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना व इतर प्रकारचे आर्थिक लाभ लवकरात लवकर दिला जाईल याचे नियोजन करण्यास सांगितले. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागात सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिल्या जात असलेल्या आरोग्यसेवा बद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, सावखेडा सिम आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजान तडवी, शिवप्रताप घारू, समीर तडवी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यावेळी प्रामख्याने उपस्थित होते.

Protected Content