पंजाबी ड्रेसमधील तरूणाने महिलेच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून केले नातीचे अपहरण

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंजाबी ड्रेसमधील तरूणाने एका महिलेच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून तिच्या नातीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरातून एका २२ वर्षांच्या तरूणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीने फिर्याद दिली आहे. यानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरून त्यांच्या २२ वर्षाच्या नातीला एका तरूणाने पळवून नेले. ही महिला आपल्या नातीसह तेथून जात असतांना हा प्रकार घडला. यात पंजाबी ड्रेस घालून आलेल्या तरूणाने महिलेच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून तिच्या नातीला घेऊन पळ काढला.

या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भल्या पहाटेच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content