अपघातात जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

yawal news2

यावल प्रतिनिधी । येथील अंकलेश्वर-बुऱ्हाणपुर राज्य महामार्गावर साकळी फाट्याजवळ ॲपेरिक्षा उलटुन झालेल्या अपघातात जखमी झालेले मोहन कोळी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, २८ जुलै २०१९ रोजी बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावर साकळी गावाच्या फाट्यावर सकाळी ११ते ११.३०च्या दरम्यान किनगावहुन यावलकडे ॲपेरिक्षा या प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनाने आपल्या नातेवाईकाच्या उत्तर कार्याच्या कार्यक्रमासाठी जात असतांना रिक्षाही साकळी फाट्यावर आली. त्यावेळी समोरून जात असलेल्या कार चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी ॲपेरिक्षा त्या कारवर जावुन उलटल्याने यातील किनगाव येथील चुंचाळे रोडा वरील रहिवासी मोहन प्रभात कोळी (वय -६५), लताबाई अशोक सुतार (वय -45) व दत्तु प्रभात कोळी (वय -58) वर्ष हे तिघ प्रवाशी या अपघात गंभीर जखमी झाले होते. तर याच रिक्षातील ६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली होती. अपघात घडल्यानंतर किनगाव येथील गंभीर जखमींना तात्काळ जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार्थ दाखल केले होते. यातील मोहन प्रभात कोळी यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला आहे.

या अपघातात प्रवाशी मोहन कोळी यांच्या मृत्यूमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपघात घडला त्यावेळी साकळी आऊट पोस्टच्या पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला का? या अपघातास कारणीभुत असलेल्या अॅपेरिक्शा चालक व कार चालक हे कुठले होते, कोण होते याचा तपास केला काय? असे अनेक प्रश्न कोळी यांच्या मृत्युमुळे समोर येत आहे या सर्व प्रकारामुळे पोलीसांची भुमिका ही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content