संततधार पावसामुळे हडकाई खडकाई नदीला पुर

 

hadkai khadakai nadi

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या पंधरा तासांपासुन संततधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मागील 4 ते 5 वर्षापासुन कोरड्या पडलेल्या शहरातील हडकाई खडकाई या दोघ नद्यांना पुर आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, गेल्या 10 दिवसांपासुन तालुक्यात विविध ठिकाणी पाऊसाच्या पाण्याने दमदार हजेरी लावली असुन, खरीप पिके सद्याच्या स्थितीला उत्तम असल्याचे वृत आहे. शहरात व परिसरात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल पुनश्च वरूणराजाचे सायंकाळ आगमन झाल्याने पाऊसाची रिपरिप सुरु असुन मागील १५ तासांपासुन सुरू असलेल्या पाऊसाने येथे ७७ मिली मीटर झाल्याने शंभरी ओलांडली आहे. तालुक्यात मागील १५ तासात झालेल्या पाऊसात सकाळी ५१.०३ मिमि, किनगाव येथे ५४.०२, भालोद येथे ७०.७ ०५, मिमि. बोमणाद ६७.०५ मिमि, फैजपुर येथे ५६.०६ मिली मीटर सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे. शहरात काल सायंकाळ पासुन सुरु झालेल्या मुसळधार पाऊसाने ७७ टक्केयांची सरासरी गाठली आहे. मागील वर्षी संपुर्ण 4 महिन्यात ७७ टक्के पाऊसाची नोंद झाली होती. हे विशेष, पाऊसाने मागील १५ तासात ७७ टक्यांची सरासरी गाठल्याने मागील 4 ते 5 वर्षापासुन कोरड्या पडलेल्या शहरातील हडकाई खडकाई या दोघ नद्यांना पुर आल्याने या पुराच्या पाण्याने शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदीत झाल्याचे चित्र आहे.

Protected Content