बस-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड रस्त्यावर बस व दुचाकी अपघातात बोरगाव येथील इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास मारवड-निम रस्त्यावर क्रीडासंकुला जवळ घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज दुपारच्या सुमारास मारवड रोडवर बसने दुचाकीला धडक दिली. यात प्रीतम गजमल शिंदे, रा. बोरगाव ता अमळनेर (वय अंदाजे ४८ )असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव असून, ते डॉ प्रशांत शिंदे यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.त्यांचा या दुर्दैवी अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत प्रीतम शिंदे यांचे पार्थिव रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर या संदर्भात पोलीस स्थानकात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content