जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथे बंद घर फोडून घरातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीप्रकरणी एका महिलेवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल सखाराम देवरे (वय-८६) रा. मोहाडी ता. जामनेर जि. जळगाव हे वयोवृद्ध आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगेले होते. या कालावधीत त्याच गावातील राहणारी सविता नाना कोलते या महिलेने घराचे कुलूप तोडून गळ्यातील गोदरेज कपाटातील १ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ऐवज लांबविला आहे. यासंदर्भात विठ्ठल देवरे यांनी संशयित म्हणून सविता कोलते यांचे संशयित म्हणून नाव घेतले असून त्यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहे.