७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हॉकी,फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे तिरंगा रॅली

जळगाव, प्रतिनिधी । हॉकी जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने व ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगले परफार्मन्स दाखवून सात मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून तिरंगा  रॅली काढण्यात आली. 

 

१११ मीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा तिरंगा  हॉकी फुटबॉलचे खेळाडू तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या खांद्यावर घेऊन शिवाजी महाराज चौक,  नेहरू चौक,  शास्त्री टॉवर मार्गे चित्रा टॉकीज चौकाने सरळ शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सदर रॅलीचे समारोप करण्यात आले.  या रॅलीमध्ये हॉकी व फुटबॉलचे खेळाडू व पदाधिकारी तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर, खो-खो प्रशिक्षक मीनल थोरात, ॲथलेटिक्स प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी नॉर्थ दमाई, कर्मचारी विनोद कुलकर्णी व विनोद माने यांची सुद्धा उपस्थिती होती.

 राष्ट्रध्वजाला सलामी देऊन तिरंगा रॅलीची सुरुवात

सर्वप्रथम सर्व संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू यांनी एकत्रितपणे जिल्हा क्रीडा संकुलातील ध्वजास मानवंदना देऊन तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली हॉकी व फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वात सदरची तिरंगा रॅली काढण्यात आली.

 तिरंगा रॅली चे विविध संघटना तर्फे स्वागत

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,मानियार व सिकलगर बिरादरी तर्फे मार्गात तिरंगा रॅली चे स्वागत करण्यात आले रॅली काँग्रेस भवन जवळ आली असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील पदाधिकारी जमील शेख, श्याम तायडे, अमजद पठाण, महेंद्र सिंग राजपूत, नदीम काझी, शोएब देशमुख, मीराताई सोनवणे, अजबराव पाटील जाकीर बागवान, मानियार बिरादरी चे सलीम शेख,सैयद चाँद,मोहसीन युसूफ,अल्ताफ शेख,अब्दुल रउफ व सिकलगर बिरादरी चे अझीझ सिकलगर,मुजाहिद खान,अन्वर खान यांनी रॅलीचे स्वागत करून सर्व खेळाडूंना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

बाहेती चौकात पेढे भरविले

मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी कै बाहेती चौकात गोर गरिबांना स्वतः अपल्या हाताने पेढे खाऊ घातले व त्यांना या स्वातंत्र दिवसाच्या आनंदात समावेश करून घेतला.

तिरंगा रॅलीचा समारोप जिल्हा क्रीडासंकुलात तिरंगा रॅली आल्यावर त्या ठिकाणी आयोजक फारुक शेख यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व राष्ट्रध्वजाचे अस्तित्व व भारताने मिळवलेले सात पदक याबाबत अत्यंत थोडक्यात परंतु मजेशीर अशी माहिती खेळाडूंना सादर केली. हॉकी महाराष्ट्राच्या सहसचिव प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी हॉकी महिलांच्या एकजुटी बद्दल व लढवय्या नेतृत्वाबाबत माहिती विशद केली.

अनुभूती स्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी क्रीडा संघटना चे महत्व विशद केले. बुद्धिबळ संघटनेचे तथा आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांनी खेळाचे महत्व सोबत भारताचे सक्षम नेतृत्व ची गरज का आहे हे सांगितले. हॉकी प्रशिक्षक सय्यद लियाकतअली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार सत्तू पवार यांनी मानले प्रास्ताविक मुजफ्फर शेख यांनी केले.

 रॅलीत  यांचा होता सहभाग 

हॉकी फुटबॉल चे सचिव फारुक शेख महाराष्ट्राच्या प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, बास्केटबॉल संघटनेचे संजय पाटील, बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे, बॅडमिंटन असोसिएशनचे दिपक आरडे, टेबल टेनिस असोसिएशनचे विवेक अळवणी, राष्ट्रीय खेळाडू कुमारी सुनयना राजपाल कुमारी हर्षाली पाटील व गार्गी ठाकरे, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अरविंद खांडेकर, मीनल थोरात, विनोद कुलकर्णी, विनोद माने तर हॉकीचे प्रशिक्षक सय्यद लियाकत अली सत्तू नारायण पवार मुजफ्फर शेख बजाज खान यांची उपस्थिती होती खेळाडूनी सुद्धा  यात सहभाग नोंदविला त्यात प्रामुख्यानेमुजाहिद काझी,ऋग्वेद चौधरी, कृष्णा राठोड, देव पांडे, धीरज जाधव, शुभम सोनवणे, पूर्वेश महाजन, पंकज बारी, दिवेश चौधरी, लोकेश पाटील, दिनेश ओडिया, चेतन माळी, ऋषिकेश भोई, शहेझाद मिर्झा, हरीप्रकाश सैनी, कुणाल पाटील, रोहन देशमुख, हेमंत सैनी , किशोर आंबटकर , दीपक वराडे, गणेश चौधरी, मोईन शेख, मिरान शेख, आदी चा समावेश होता.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1435147336867663

 

Protected Content