तरूणाकडून मोबाईल जबरी हिसकावून धुमस्टाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेणुकानगर येथील तरूणाचा खिश्यातील मोबाईल अज्ञात दोन जणांना दुचाकीवर येवून हिसकावून लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजेश मुकुंदा गुरव (वय-३२) रा. रेणूका नगर, जळगाव हा तरूण आई व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. राजेश हा शहरातील गणपती हॉस्पिटल येथे १० वर्षांपासून वार्ड बॉय म्हणून काम करत आहे. सोमवार १३ डिसेंबर रोजी गणपती हॉस्पिटल येथील काम आटोपून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून इच्छादेवी चौकातून सायकलीने जात असताना त्याच्या मागून एका पल्सर गाडीवर अज्ञात दोन भामटे येवून खिशातील ठेवलेला ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून भुसावळकडे पसार झाले. याप्रकरणी राजेश गुरव यांनी मंगळवारी १४ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

 

Protected Content