जळगाव जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आगामी सण व उत्सव लक्षात घेता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २१ सप्टेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन सर्वस्तरातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात नागरीकांची गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच आगामी काळात सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याकरीता २१ सप्टेंबर २०२० पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे. हे आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Protected Content