साकळी दंगलीतील आरोपींचा जामीन मंजूर

 

भुसावळ प्रतिनिधी । साखळी येथे (दि.13जुलै) रोजी घडलेल्या दंगल प्रकरणी यावल पो. स्टे. येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती. आरोपींना जामीन अर्ज केला असता भुसावळ येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भंसाली यांनी आरोपी यांना रु. 25,000/च्या जामीनावर अटी व शर्तीवर मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे.

प्रेसनोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी यावल येथील (दि.13जुलै) रोजी घडलेल्या दंगल मधील फिर्यादी याने यावल पो.स्टे. येथे फिर्याद दाखल केली होती की, आरोपी भुषण मधुकर कोळी, सागर अशोक पाटील, विशाल श्रीकृष्ण बोरसे, अक्षयरामचंद्र शिरसाडे व अजय उर्फ गोल्या संतोष कोळी यांनी गावात झालेले कोरोनाचे संक्रमण हे विशिष्ट धर्माचे लोकांमुळे झाले. या कारणावरुन लॉकडाऊनचे उत्लंघन करत तोडीला मास्क न लावता गैरकायद्याची मंडळी जमयुन कोरोनाचे संक्रमण वाडेल अशी धोक्याची कृती करत फिर्यादी व साक्षीदार यांचा रस्ता अडवुन शिवीगाळ, चापटा बुक्कयांनी आणि लाथांनी मारहाण करत, लोखडी रॉडने मारून गंभीर जखमी केले व फिर्यादीचे खिशातुन रु. 1500/-काबुन पळुन गेले.

या मजकुराची फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गु.र.नं. 122/2020 यावल पो.स्टे. येथे भा.द.वि. कलम 305, 326,143,147,148, 149, 323, 504, 506, आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37[1][3] चे उल्लंघन कलम 135 तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींना अटक करण्यात आलेली होती. म्हणुन आरोपी यांनी जामीन अर्ज केला असता भुसावळ येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भंसाली यांनी आरोपी यांना रु. 25,000/च्या जामीनावर अटी व शर्तीवर मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहे. सदरील जामीन अर्जाची सुनावणी कामी सरकार तर्फे सरकारी वकिल  पी.पी. भोंबे तसेच मुळ फिर्यादी तर्फे अॅड. नुर मोहम्मद यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. राजेंद्रटी, राय, अॅड. खेवळकर यांनी काम पाहिले.

Protected Content