जामनेरात जी एम नर्सिंग महाविद्यालयाचे आमदार महाजन यांच्या हस्ते उद्घाटन (व्हिडीओ)

जामनेर भानुदास चव्हाण | जामनेर शहरातील दर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित जी एम नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले, “तालुक्यात पहिल्यांदाच जामनेर शहरांमध्ये नर्सिंग महाविद्यालय चालू झाले असून याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील मुला-मुलींना होणार आहे. येथून पदवी घेऊन आपल्या गावातील लोकांची सेवा करण्याचे काम विद्यार्थ्यांना करता येईल. त्याचबरोबर दोनशे बेडसह अत्याधुनिक उपचार व सेवा हॉस्पिटलमध्ये मिळणार असून याचा फायदा तालुकावासियांना होणार आहे.”

जामनेर शहरातील दर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित जी एम नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम प्रवेश घेणाऱ्या मुलांना आमदार महाजन यांच्या हस्ते प्रवेश पत्र देण्यात आले. यावेळी जी एम नरसिंग महाविद्यालयाचे प्रमुख विश्वनाथ चव्हाण, रुष्मिता मुजुमदार, रामदास आरक, अक्षय जाधव, हेमंत वाणी, योगेश पाटील, अविनाश भोई, जितेंद्र कुमावत, जगदीश बैरागी, नरेंद्र चव्हाण, अरविंद पाटील, राहुल बाविस्कर, नरेंद्र माळी, विशाल पालवे, शुभम माळी, हेमलता राणे, मानवी पवार, गणेश शिंदे, शिवाजी शिंदे, डॉ राजेश नाईक, निलेश चव्हाण, डॉ प्रताप पाटील, डॉ राहुल माळी आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रास्ताविक डॉक्टर विश्वनाथ चव्हाण तर सूत्रसंचालन निलेश चव्हाण यांनी केले.

जामनेर शहरातील दर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित जी एम नर्सिंग महाविद्यालयांमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. दि.14 डिसेंबर ते 28 डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू राहणार असून जी एन एम नर्सिंग कोर्सचा कालावधी तीन वर्ष आहे. यासाठी पात्रता बारावी विज्ञानमध्ये किमान आरक्षितसाठी 45 टक्के व अनारक्षितसाठी 50 टक्के गुणांनी उतीर्ण असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर ए एन एम नर्सिंगकोर्ससाठी विद्यार्थी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत उतीर्ण असावा त्यामध्ये आरक्षितसाठी 45 टक्के व आरक्षितसाठी 45 टक्के गुण असावे. या कोर्सचा कालावधी दोन वर्षे राहणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी नर्सिंग कोर्स करण्यासाठी शासकीय नाममात्र फी घेतली जाणार असून या नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी योगेश पाटील यांना मोबाईल क्रमांक 9370604904 या क्रमांकावर किंवा जी एम नर्सिंग महाविद्यालय, जामनेर याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/442100910839141

Protected Content