दुकान फोडले तर ग्रामपंचायत कार्यालयात चोरीचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील एकाचे कटलरी दुकान फोडून दुकानातील रोकड व वस्तू असा एकुण ३० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लांबविला तर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न पहाटे उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील मारूती मंदीराजवळ अशोक रतन जाधव यांचे कटलरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून जाधव हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कलटरीच्या दुकानाचे शटर उचकावून दुकानात ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड आणि ७०० रूपये किंमतीचे बेन्टेक्सच्या बांगड्या असा एकुणन ३० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १४ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. त्याचवेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप देखील तोडलेले दिसून आले. यात कार्यालयातील लोखंडी कपाटातील कागदपत्र फेकून दिल्याचे समोर  ग्रामपंचायत शिपाई राजु काशिनाथ पाटील यांनी सांगितले. आले आहे. याप्रकरणी अशोक जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content