छत्रपती संभाजीनगर-धाराशिव जिल्हयांच्या नामांतराला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकार व केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही जिल्हयातील नागरिकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणीनंतर हायकोर्टाने ८ मे रोजी आज निकाल जाहीर केला आहे.

दोन्ही जिल्हयांच्या नामांतराला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर हायकोर्टाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी सुनावणी घेतली होती. ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुनावणीनंतर न्यायाधीशांनी आपला निकाल राखीव ठेवला होता. यासंबंधीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागाला उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचे अनुक्रमे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नाही, असा निकाल हायकोर्टाने दिला आहे. आता या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची संमती मिळाल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मानला जात आहे.

Protected Content