बोगस सोयाबीन प्रकरणी अकोल्यात महाबीजसह तीन कंपन्यांविरूद्ध खटले

अकोला (वृत्तसंस्था) बोगस सोयाबीन बियाणेप्रकरणी अकोल्यातील बार्शीटाकळी न्यायालयात महाबीजसह तीन कंपन्यांविरूद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हे खटले दाखल केले आहेत.

 

बार्शीटाकळी तालुका न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ‘महाबीज’सह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. याआधी जिल्ह्यातील मूर्तिजापूर न्यायालयात दोन कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. तर याआधी मूर्तिजापूर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये मे. सारस अॅग्रो इंडस्ट्रीज आणि मे. प्रगती अॅग्रो सर्व्हिसेस या दोन कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे ४९ नमूने तपासणीसाठी घेतले होते. यातील ११ नमुने अप्रमाणित निघाल्यानंतर संबंधित पाचही कंपन्यांना कृषी विभागाने कारवाईसाठी नोटीस दिली होती.परंतू कंपन्यांकडून उत्तर अपेक्षित न आल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन खटले दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Protected Content