मोटार अपघात दाव्यांवर भुसावळातच होणार कामकाज

भुसावळ Bhusawal प्रतिनिधी । येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आता अपघात दाव्यांवर देखील कामकाज होणार असून यामुळे भुसावळसह परिसरातील पक्षकारांचा जळगावला जाण्याचा त्रास वाचणार आहे.

भुसावळ शहरात २०१४ मध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय Bhusawal Court मंजूर झाल्यानंतर मोटार अपघात दावा न्यायधिकारणही सुरु व्हावे, अशी मागणी होती. याबाबत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शासनाकडे हा विषय लावून धरला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरु झाली आहे.

भुसावळ विभागातील यावल Yawal, रावेर Raver , बोदवड Bodvad , मुक्ताईनगर Muktainagar व भुसावळ Bhusawal तालुक्यातील अपघाताचे दावे जळगाव येथून भुसावळ न्यायालयात वर्ग केले जाणार आहेत. यानंतर पक्षकारांना जळगावला जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच दाव्यांच्या कामकाजासाठी जळगावला जाण्यासाठी धावपळ करण्याची गरज आता उरणार नाही.

मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणांमधील नुकसान भरपाईसाठी, ज्यामध्ये मोटार वाहनाच्या वापरामुळे व्यक्तीचा मृत्यू किंवा शारिरिक इजा पोहोचवणे किंवा एखाद्या त्रसस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी होणे, या प्रकरणातील दाव्यांवर निर्णयासाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाची स्थापना केली जाते.

Protected Content