रात्री दीड वाजता पकडले अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर

भडगाव Bhadgaon प्रतिनिधी । तालुक्यातील गिरणा नदीतून अवैध वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर रात्री दीड वाजता तहसीलदारा सागर ढवळे व त्यांच्या सहकार्‍यांनी जप्त केले आहेत.

भडगाव Bhadgaon येथिल गिरणा नदी Girna River पात्रातुन रात्री दीड वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार सागर ढवळे यांनी पकडले असून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उचलून ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करत असताना तहसीलदार यांच्या पथकाने हे ट्रॅक्टर पकडले. दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. या ट्रॅक्टर चालका, मालकावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी सांगितले. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतुक बाबत कारवाई केल्यामुळे तहसीलदार सागर ढवळे यांचे कौतुक होत आहे.

या पथकात तलाठी रत्नदीप माने, मंडळाधिकारी आर. पी. शेजवळकर आदींचा पथकात समावेश होता. शहरात सर्वात जास्त अवैध वाळू उपसा जुना पिंपळगाव रस्त्यावरील घोडदे बाबा परीसरातुन होत असून ती वाळू गॅस गोडाऊन परिसरात ठेवली जाते. ही वाळू तेथून रात्री अपरात्री बाहेरगावी रवाना केली जाते. या ठिकाणी सुद्धा तहसीलदार यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Protected Content