आव्हाणे येथील गिरणा पात्रातून अवैध वाळू साठा जप्त

जळगाव jalgaon प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून रात्री उशीरापर्यंत महसूल खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सोमवारी रात्री प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात आव्हाणे येथे गिरणा Girna River नदीपात्र परिसरात वाळू माफियांनी केलेले शेकडो ब्रास वाळू साठे जप्त केले. तालुक्यातील एकाही वाळू गटांचा लिलाव झालेला नसताना वाळू माफियांनी गिरणा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने आव्हाणे येथील नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला असून गावात ठिकठिकाणी याला ढिगार्‍यांच्या स्वरूपात जमा करण्यात आले होते.

उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार व अन्य कर्मचार्‍यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात थेट गिरणा नदी पात्रात उतरून कारवाई केली. यात परिसरातून सातशे पेक्षा जास्त ब्रास वाळू साठे जप्त केले आहेत. तसेच अवैध वाळू उपसा करणारे डंपर जप्त करण्याचीही कारवाई व पंचनामा रात्री उशीरापर्यंत सुरू होता. कारवाईमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांचा समावेश होता.

Protected Content