पंतप्रधानांच्या ‘आंदोलनजीवी’ शब्दावर योगेंद्र यादव यांची टीका

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था   । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलतांना आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला आहे. या शब्दावरून राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

योगेंद्र यादव यांनी पंतप्रधान मोदी स्वतः काही दिवसापूर्वी आंदोलनाबाबत बोलत होते. काँग्रेस विरोधात आंदोलन करण्याची भाषा करत होते. मात्र आता त्यांना आंदोलन खटकत आहे असे म्हटले आहे. कधी कधी वाटते की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचा काय होईल असा प्रश्न यादव यांनी उपस्थित केला आहे.  दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्या परजीवी मानतात पंतप्रधान मोदी यांनी एकाच एक नवा शब्द जन्माला घातला आहे तो म्हणजे आंदोलनजीवी. पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत अशा वेळी त्यांना अशाच पद्धतीचे बोलणे शोभा देत नाहीत असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे

हो मी आंदोलनजीवी आहे कारण भारताला स्वातंत्र्य आंदोलनामुळेच मिळाला आहे.  या देशाने अनेक मोठमोठी आंदोलने पाहिली आहेत त्या आंदोलनांच्या माध्यमातून परिवर्तन झाले आहे. काँग्रेस काळात पंतप्रधान मोदीच जनआंदोलनाची गोष्ट करत होते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून त्यांच्या पक्षाने आंदोलन केली होती असे देखील योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

 

Protected Content