पिडीतेच्या पार्थिवावर जबरदस्तीने अंतीम संस्कार : यूपी पोलिसांचा अमानवीपणा

शेअर करा !

हाथरस वृत्तसंस्था । येथील एका तरूणीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी पिडीतेच्या पार्थिवावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे. यूपी पोलिसांच्या या अमानवीपणावर आता सर्वत्र टीका होत आहे.

हाथरस येथील दलीत समुदायातील १९ वर्षाच्या तरूणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर अनन्वीत अत्याचार केल्याची घटना घडल्याने सर्व देश सुन्न झाला आहे. काल या तरूणीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. १६ दिवस या तरूणीवर दिल्ली येथील सफदरजंग रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र तिची जीवनासोबतची लढाई हरल्याने आता देशभरात तीव्र निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, रात्री एक वाजता पीडित तरूणीचा मृतदेह घेऊन पोलीस हाथरस येथे आले. यावेळी तिच्या घरच्यांनी आपल्या कन्येची घरूनच अंत्ययात्रा काढण्याची मागणी केली. तिच्यावर रितीरिवाजाने अंतीम संस्कार व्हावे अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी याला साफ धुडकावून लावत रात्री अडीच वाजता तिच्या घरातील कोणताही सदस्य उपस्थित नसतांना पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घरची मंडळी मृतदेहावर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्काराची मागणी करत असतांना पोलिसांनी दांडगाईने स्वत:च अंत्यसंस्कार करत असल्याने प्रचंड खळबळ उडाली असून आता या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!