कोरोनाचा उद्रेक : राज्यात आज नव्याने १४,९७६ रुग्ण पॉझिटिव्ह

शेअर करा !

मुंबई प्रतिनिधी । राज्यात आज कोरोनाचे १४,९७६ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १९,२१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,६६,१२९ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत १०,६९,१५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,६०,३६३ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ण (Recovery Rate) ७८.२६ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६५ % इतका आहे. सध्या राज्यात २१,३५,४९६ जण होम क्वारंटाईन असून २९,९४७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत राज्यात ६६,९८,०२४ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १३,६६,१२९ (२०.४० टक्के) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!