पाचोरा प्रतिनिधी । आज पाचोरा शहरासह सर्वत्र हरितालिका पूजा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. चिंतामणी कॉलनीतील शेलकर परिवारातर्फे विधीवत पुजन करण्यात आली.
“जन्मोजन्मी हाच पती मिळो” अशी रास्त हाक महिलांनी महादेवाकडे हरितालिका पुजन करते समयी केली. शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शेलकर परिवारातर्फे त्यांचे निवासस्थानी हरितालिका पूजेचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी परिसरातील असंख्य महिला येऊन विधीवत पुजन करतात. अतिशय भक्तीमय अशा वातावरणात सदरचे पुजन केले जाते. याकामी शहरातील कौस्तुभ महाराज, निखिल महाराज, समाधान महाराज येवुन महिलांना हरितालिका पूजेचे महत्व पटवुन देत खेळीमेळीच्या वातावरणात पुजा संपन्न करतात. या दिवशी महिला ह्या पुर्ण दिवस उपवास करुन फक्त फळाहार घेतात.