शासनाच्या योजना व सवलतीचा लाभ घेतांना एजटांपासून सावध रहा- खा. उन्मेश पाटील

पाचोर प्रतिनिधी । राज्य असो की केंद्रसरकार असो कोणतेही सरकार लाभ थेट गरजुं पर्यंत यासाठी प्रयत्नशिल असते, परंतु काही नागरिक एजंटाच्या भुलथापांना बळी पडून अर्थीकसह अनेक बाबींना बळी पडतात. त्यामुळे एजंटापासून सावध राहून लाभार्थीनी सर्वात आधी त्याचा अभ्यास करावा असे आवाहन खासदार उन्मेश पाटी यांनी केले.

पाचोरा शहरात आता प्रभाग निहाय कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. खा. उन्मेश पाटील पुढे बोलतांना सांगीतले की, सरकारकाच्या विविध हेडखाली एवढया योजना आहेत लाभार्थी त्याचा विचारही करू शकत नाही. शिवाय त्याचा अभ्यास करून सतत मागोवा ठेऊन योजना पदरात  देखील पाडून घेऊ शकत नाही.

नेमकी ही बाब आमचे भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटीचे संचालक डॉ. भुषण मगर यांनी नेमकी ही बाब घेरली आणि सदरचे काम अत्यंत योग्य रितीने व्हावे, फक्त नांव नोंदणी करून फायदा नाही तर गरजु जनते पर्यत वेळो-वेळी येणाऱ्या योजना, सवलती जनते पर्यत पोहचण्यासाठी एस. डी. एम. मल्टी सार्व्हिसेसचे प्रोप्रा. संदीप महाजन यांना हे संपुर्ण पॅकेज दिले आहे.

विशेष गर्वाची बाब म्हणजे या वर्षाचा नदी-नाले एक करून  धरणे सर्वत्र १०० टक्के भरणारा पाऊस सकाळ पासुन सुरु असतांना देखील या मंगल कार्यालयाची संपुर्ण जागा गरजु जनतेच्या उपस्थीतीमुळे पूर्ण पॅक झाली आहे. काही नागरीकांना बसण्यासाठी जागा नसल्याने निम्यापेक्षा  जास्त नागरिक घरी गेलेत त्याचीही दखल आयोजकांनी घ्यावी.

विशेषबाब म्हणजे आयोजक अमोल शिंदे आणि डॉ. भुषण मगर तसेच प्रकल्प प्रमुख यांनी ध्येय अँकेडमी आणि एस. डी. एम. मल्टी सर्व्हीसेसचे संचालक, ध्येय न्युजचे संपादक यांचे प्रामुख्याने मी कौतुक करतो सदरची योजना केंद्र सरकारने जाहीर करून अवघे ८ दिवस सुद्धा होत नाही तोपर्यंत या संपुर्ण टिमने संधीचा फायदा घेत या भव्य मेळाव्याचे आयोजन केले ही बाब कौतुकास्पद आहे. खा. उन्मेश पाटील यांच्या सुचनेला आदेश मानत भा.ज.ता.अध्यक्ष अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजने संदर्भात पाचोरा शहरात आता प्रभाग निहाय कॉर्नर बैठकीचे आयोजन भाजपा तालुका प्रमुख अमोल शिंदे आणि डॉ. भुषण मगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प प्रमुख संदीप महाजन यांच्या परिश्रमाने पाचोरा येथे महालपुरे मंगल मंगल कार्यालयात आयोजीत केंद्र सरकार श्रमिक लेबर कार्ड योजनेच्या मेळाव्यास अतिमुसळधार पावसात देखील प्रचंड प्रतिसाद मिळवत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

परंतु पावसाअभावी अनेक श्रमिक माता-भगिनींना कार्यक्रम स्थळी पोहचणे शक्य झाले नाही. तर जे पोहचले त्यांना जागे अभावी माघारी परतावे लागले. म्हणुन आता पुन्हा प्रत्येक श्रमिक माता-पिता, बंधु-भगिनींन पर्यंत ही योजना व त्याची माहिती  पोहण्यासाठी या योजनेचे प्रकल्प प्रमुख संदीप महाजनसर हे पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभागात भा. ज. पा. तालुका प्रमुख अमोल शिंदे (शिंदे ॲकेडमी) आणि डॉ. भुषण मगर यांच्या प्रमुख उपस्थीत कॉर्नर मिटींगचे आयोजन करणार आहे त्याची वेळ, दिनांक, ठिकाण हे कॉर्नर बैठकीच्या एक दिवस आधी कळवण्यात येईल पाचोरा-भडगाव शहराच्या प्रत्येक घरा – घरात व शहरा नंतर असाच उपक्रम ग्रामीण भागासाठी देखील राबववुन प्रत्येक घरात व व्यक्ती पर्यंत ही योजना पोहचण्यासाठी प्रयत्नशिल आहोत.

सावधान – या योजना प्राप्त करण्यासाठी कोणत्याही आमीषाला बळी पडू नका अथवा कोणालाही पैसे देऊन  स्वतःची फसगत करून घेऊ नका शिवाय या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी जात- -पात – धर्म – पक्ष -संघटना असे कोणतेही बंधन नाही प्रत्येक पात्र भारतीय नागरीक या योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही शिंदे यांनी अखेरीस सांगीतले.

डॉ. भुषण मगर यांनी शासन समाजातील ९५ टक्के घटकांना होणाऱ्या आजारावर सुमारे ५ लाखा पर्यंत विविध योजनेखाली विनामुल्य मदत करू शकतात व त्यासर्व सुविधा आमच्या विघ्नहर्ती मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल मध्ये उपलब्ध आहेत परंतु अपुर्ण माहिती व कागदपत्रांमुळे नागरीक अशा योजनांचा लाभ न घेता विनाकारणा अर्थींक भुर्दड सोसतात यासाठी आपले सर्व प्रकारचे कागदपत्रे विविध योजना प्राप्त करण्यासाठी पुर्तता करून ठेवणे आवश्यक आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!