यावल तालुक्यात डेंग्यू रूग्णांच्या संख्येत वाढ

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत नाही तोच आता तालुक्यातील ग्रामीण परिसरात डेंग्युचा आजार हा वेगाने वाढत आहे. नागरीकांसह आरोग्य यंत्रणेला अधिक सज्ज व दक्ष राहावे लागणार आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा, वड्री, सातोद, कोळवद व आदी गावांमध्ये डेंग्यु रुग्ण मिळुन आले.  यात डेंग्युच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची मोठी संख्या असल्याने पालकवर्गामध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेत आहे. या संदर्भात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. सातोद, कोळवद, वड्री, हिंगोणा, डोंगरकठोरा यासह अशा अनेक ग्रामपंचायत पातळीवर गावात स्वच्छता मोहीम योग्य प्रकारे राबविली जात नसुन, जंतुनाशक औषधींची नियमीत फवारणी केली जात नसल्याने डासांचा उपद्रव्य सातत्याने वाढतांना दिसत आहे. यासाठी ग्रामीण पातळीवर आरोग्य यंत्रणेने अधिक सर्तक राहुन तात्काळ युद्धपातळी घरोघरी जावुन संपुर्ण  कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी करणे अत्यंत गरजे असुन , तसे न झाल्यास डेंग्यु आजाराच्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढेल व परिस्थिती हाता बाहेर जाईल, अशी भिती नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे यांनी तात्काळ या विषयाची दखल घेत सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रांना नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घरोघरी जावुन सर्वक्षण करण्याच्या आपण सुचना दिल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

Protected Content