हरेश्वर कॉलनीत घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

gharfodi

जळगाव प्रतिनिधी । हरेश्वर कॉलनीतील वृंदावन अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोने व चांदी असा एकुण 1 लाख 26 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्नेहा नितीन हरव्यासी रा. वृदावन अपार्टमेंट, हरेश्वर कॉलनी हे कुटुंबासह राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त त्यांच्याघरी बडोद्याची बहिण नम्रता व तीचे मुले आलेले आहे. 13 मे रोजी रात्री उशीरापर्यंत जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गच्चीवर गेले. मध्यरात्री 14 मे रोजी 3 वाजेच्या सुमारास स्नेहा यांना कुलुप तोडण्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. पुन्हा 3.30 वाजता तसाच आवाज आल्यानंतर सर्वजण जागी झाले. इमारतीवरून खाली डोकावून पाहिले असता त्यांना तोंडाला रूमाल लावलेले तीन जण पळतांना दिसून आले. त्यांनी खाली येवून पाहिले असता घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोने व चांदी चोरानी नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीसांनी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.

पोलीसांची घटनास्थळी अर्धातासात दाखल झाले. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 20 हजार रूपयांचे 8 ग्रॅम सोने, 15 हजार रूपयांचे 6 ग्रॅम कानातले सोन्याचे टॅप्स, 10 हजार रूपयांचे 4 ग्रॅम सोन्याचे कानातले टॅप्स, 10 हजार रूपयांचे 4 ग्रॅम सोन्याचे कानातले टॅप्स, 7 हजार 500 रूपयांचे 25 ग्रॅम चांदी, तीन हजार रूपयाचे दोन ग्रॅम टॅप्स, 20 हजार रूपयांचे 8 ग्रॅम सोन्याची चैन, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमची अंगठी, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमचे पेंडल, 5 हजार रूपयांचे दोन ग्रॅम पेंडल, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमचे पेंडल, 5 हजार रूपयांचे 2 ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, 5 हजार रूपयांचे 2 ग्रॅमचे सोन्याचे पेंडल आणि 3 हजार रूपये किंमतीचे चांदीची वाटी आणि चमचा असा एकुण 1 लाख 26 हजार रूपयांचा मुद्देमाल पोबारा केला आहे. स्नेहा हरव्यासी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Add Comment

Protected Content