माहेरुन पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । माहेरुन पाच लाख रुपये आणावे, या कारणावरुन पिंपरी-चिंचवडमधील मयूर कॉलनीतील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेविया नितेश साळवे वय २७ असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, सेविया हिचा नशिक येथील नितेश सुरेश साळवे याच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर पती निलेशसह सासरच्यांनी सेविया हिस माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन शिवीगाळ तसेच धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ केला. वेळावेळी याच कारणावरुन होत असलेल्या छळाला कंटाळून सेविया ह्या माहेरी मयुरी कॉलनी येथे आल्या. महिला दक्षता समिती तक्रारीनंतरही समझोता न झाल्याने सेविया साळवे यांनी १३ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास छळाबाबत पोलिसात तक्रार दिली. 

या तक्रारीवरुन सेविया हिचे पती नितेश साळवे,  सुरेश जोसेफ साळवे, मेरी सुरेश साळवे, फिलीप सुरेश साळवे, भरत सुरेश साळवे सर्व रा. गोदावरी कॉलनी सटाणा रोड, मनमाड नाशिक या पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहेत.

Protected Content