महिलेच्या पर्समधून सोन्याची अंगठी लांबविणाऱ्या महिलेस पकडले रंगेहात

जळगाव प्रतिनिधी । पायी जाणाऱ्या महिलेस धक्का मारत तिच्या पर्समधून सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या महिलेस नागरिकांनी रंगेहात पकडल्याची घटना आज फुले मार्केट येथे घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेस ताब्यात घेतले आहे. 

मीना बबन उपाळे रा. हरिविठ्ठल नगर असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ परिसरातील हनुमान कॉलनीतील रहिवासी कविता प्रवीण महाले या त्यांच्या मावशी सुनंदा सुधाकर चौधरी यांच्यासोबत सोने खरेदीसाठी बाजारपेठेत आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सराफ बाजारात आल्या होत्या. बाजारपेठेत किरकोळ खरेदी केल्यानंतर त्यांनी सोने खरेदी केली. खरेदी केलेली सोन्याची अंगठी सुनंदा चौधरी यांनी त्यांच्याकडे असलेल्या पर्समधील छोट्या पर्समध्ये ठेवली आणि त्या फुले मार्केटमधून जात होत्या. याचवेळी त्यांना गर्दीत एका महिलेने धक्का मारीत चोरी करणारी महिला सुनंदा चौधरी यांच्या शेजारीच उभी राहिली. याचवेळी चोरी करणारी महिलेने सुनंदा चौधरी यांच्या पर्समधील छोटी पर्स घेवून पसार होण्याच्या तयारीत होती. दरम्यान चोरी करणार्‍या महिलेच्या हातात सुनंदा चौधरी यांना त्यांच्याकडील पर्स दिसल्याने त्यांनी आराडाओरड केल्याने नागरिकांनी पर्स लांबविणार्‍या महिलेला पकडून ठेवले. 

पर्स लांबविणार्‍या महिलेला पकडताच तिच्याकडे चौधरी यांची पर्स मिळून आली. त्यामध्ये त्यांनी खरेदी केलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी मिळून आली. याप्रकरणी नागरिकांनी त्या महिलेला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने आपले नाव मीना बबन उपाळे रा. हरिविठ्ठल नगर असे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला अटक करीत तिच्याविरुद्ध शहर गुन्हा दाखल केला आहे.  तिच्याकडून चोरलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला.

 

Protected Content