विरावली येथे सैनिकांसह परिवारास दोन दिवशीय मोफत सेवा

यावल प्रतिनिधी । 14 आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विरावली गावात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाभिक समाज बांधवांतर्फ मोफत सेवा प्रदान केली जात आहे.

गावातील नाभिक समाजाचे दिलीप शामराव फूलपगारे, सतीश यादव फुलपगारे,  दिनेश पुंडलिक फूलपगारे,  राहुल दिलीप फूलपगारे, विशाल विलास फूलपगारे आणि फुलपगारे परिवार यांचे कडून त्यांचे गावातील देशाच्या रक्षणासाठी कार्यरत सैनिक तथा सेवानिवृत्त सैनिक याना स्वातंत्र्यदिना निमित्त १४ आणि १५ अगस्त २०२१ ला मोफत दाढ़ी कटिंग ची सुविधा प्रदान करने बाबत निर्णय घेउन तशी सैनिक/परीवाराना सुविधा प्रदान करण्यात आली असुन. नाभिक समाज बांधवांच्या या त्याचे महान कार्य बद्दल वीरावली गावचे नाभिक सामाजाचे सारे गाव व पारिसारातिल नागरिक यांचे कडून स्वागत व कौतुक केले जात आहे .ज्यात  गावातील सैनिक प्रेमी नागरिक, तथा माजी सैनिक मुकेश राजपुत सीआरपीएफ, व सारे सेवारत सैनिक ज्यात बीएसएफ सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप बाळु अड़कमोल CRPF, अमोल बाळु अड़कमोल CISF,  प्रशांत मिलिंद अड़कमोल व संकेत संजय अड़कमोल, Army सारे राहणार विरावली यांनी हया निर्णया चे स्वागत करून सैनिक आणि पारिवार यांचे बद्दल वीरावली गावातिल नाभिक समाज यांचे या प्रेमाचे मनपुर्वक कृतनता व आभार व्यक्त केले आहे . नाभिक समाज बांधवांच्या या आगळया वेगळया कार्यास सैनिक बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला असुन त्यांच्या या देश भावनेचे कौत्तुक होत आहे .

 

Protected Content